अथक संघर्ष, कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर टीव्ही मनोरंजन विश्वात वेगळे स्थान निर्माण केलेल्या राजु श्रीवास्तवचे आज अखेर निधन झाले आहे. कॉमेडिचा बादशहा अशी त्याची ओळख होती. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यानं प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन केले होते. त्याच्या जाण्यानं टीव्ही मनोरंजन तसेच बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. कित्येक मान्यवरांनी त्याला आदरांजली वाहिली आहे. काही दिवसांपूर्वी तो ट्रेड मिलवर धावत असताना त्याला अचानक हदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी एम्सममध्ये दाखल करण्यात आले होते.